ग्रामपंचायत तळेगाव – माहिती

सह्याद्री पर्वताच्या रांगेच्या पायथ्याशी वसलेले ग्रामपंचायत तळेगाव हे निसर्गसौंदर्याने नटलेले, शेतीप्रधान आणि विविध वाड्या–पाड्यांनी समृद्ध असे गाव आहे. तळेगाव ग्रामपंचायतीमध्ये खरशेत – उमरोली, आनंदपूर, भट्टीचीवाडी, शिरसोनवाडी अशा उपगावांचा समावेश होतो.
गावात शिक्षण, आरोग्य, डिजिटल सेवा, पाणीपुरवठा, अंगणवाडी, इंटरनेट, सीसीटीव्ही, बहुउद्देशीय केंद्र आणि इतर शासकीय कार्यालये उपलब्ध आहेत.
पत्ता: मु.पो. तळेगाव, ता. मुरबाड, जि. ठाणे – 421401
अधिकृत ईमेल: gptalegaon21@gmail.com

🏛️ प्रशासकीय रचना

मुरबाड पंचायत समिती ही जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींमधील दुवा म्हणून कार्य करते. समितीचे नेतृत्व सभापती करतात तर उपसभापती, गटविकास अधिकारी (BDO) आणि विभागीय अधिकारी यांच्या सहकार्याने विविध विभागांतील कामे केली जातात. समिती शिक्षण, आरोग्य, शेती, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित योजनांची अंमलबजावणी करते.

लोकसंख्या व घरसंख्या

  • एकूण लोकसंख्या: 2,900

  • एकूण घरसंख्या: 629

  • साक्षरता: 76.03%

  • क्षेत्रफळ: 2098.6 हेक्टर

  • मुख्य व्यवसाय: शेती

ग्रामपंचायत सदस्यांची माहिती

ग्रामपंचायतीमध्ये एकूण १ ०  सदस्य आहेत, ज्यामध्ये सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचा समावेश आहे. सर्व सदस्य गावाच्या विकासासाठी समर्पित असून, नागरिकांशी सतत संपर्क ठेवून विविध योजना आणि सुविधा गावात राबवित आहेत. 

ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांची यादी:

  • सरपंच: श्री. राजेंद्र गजानन शिंगवा

  • उपसरपंच: सौ. सविता शशिकांत हिलाम

  • ग्रामपंचायत अधिकारी: श्री. बाळाराम सखाराम गायकर — 📞 9029194004

ग्रामपंचायत सदस्य: 

  • एकूण प्रभाग: 10

  • सदस्यांची यादी:

    1. श्री. राजेंद्र गजानन शिंगवा – सरपंच

    2. सौ. सविता शशिकांत हिलाम – उपसरपंच

    3. श्री. शक्ति विलास देशमुख – सदस्य

    4. सौ. संगीता रविंद्र देशमुख – सदस्य

    5. श्री. सचिन चंद्रकांत देशमुख – सदस्य

    6. सौ. जिजाबाई राजेंद्र वाख – सदस्य

    7. श्री. राजेंद्र दामू हंबीर – सदस्य

    8. सौ. यमुनाबाई संतोष पादीर – सदस्य

    9. श्री. वसंत रामू हिलाम – सदस्य

    10. सौ. रंजना विठ्ठल ठाकरे – सदस्य

ही सर्व सदस्य मंडळी ग्रामपंचायतीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत असून, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहेत.

ग्रामपंचायत आढावा

गावात एकूण — जिल्हा परिषद शाळा आणि — अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. 

महिला सक्षमीकरणासाठी गावात बचतगटांच्या माध्यमातून शिलाई मशीन प्रशिक्षण, उद्योजकता उपक्रम यांसारख्या उपक्रमांचे आयोजन केले जाते.

ग्रामपंचायतीत जलजीवन मिशनस्वच्छ भारत अभियानप्रधानमंत्री आवास योजनामहिला बचतगट योजनाजन मन योजनाआदिम घरकुल योजनाशबरी आवास योजनामोदी आवास योजना आदी विविध शासकीय योजना राबविण्यात येत आहेत. ग्रामपंचायतीचा वार्षिक निधी सुमारे –/- असून तो आरोग्य, शिक्षण, उपजीविका, स्वच्छता, पाणीपुरवठा, दिव्यांग कल्याण, महिला व बालकल्याण, रस्ते व गटारे विकास, पशुसंवर्धन, कृषी व सांस्कृतिक उपक्रम या क्षेत्रांमध्ये वापरला जातो. 

धार्मिक स्थळे व उत्सव

  • धार्मिक स्थळे:

    1. तळेगाव – हनुमान मंदिर, गणपती मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, म्हसोबा मंदिर

    2. उमरोली – हनुमान मंदिर व दत्त मंदिर

    3. खरशेत – हनुमान मंदिर

  • उत्सव:

    • गावदेवी / म्हसोबा यात्रा

स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणस्वच्छता हि सेवा, आणि प्लास्टिक बंदी अभियान ही उपक्रम राबविले जातात.

ग्रामपंचायतीचे अधिकृत कामकाजाचे वेळापत्रक सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायं ६.१५ पर्यंत असून, शनिवार, रविवार व शासननिर्धारित सुट्ट्यांना कार्यालय बंद असते.

शैक्षणिक संस्था (Schools)

ग्रामपंचायत हद्दीत एकूण ६  जिल्हा परिषद शाळा कार्यरत आहेत. या शाळांमधून प्राथमिक शिक्षणापासून उच्च प्राथमिक शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छ परिसर, पिण्याचे पाणी, शौचालय सुविधा आणि डिजिटल शिक्षण साधने उपलब्ध आहेत.

ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळांची यादी पुढीलप्रमाणे आहे —

प्राथमिक शाळा – UDISE माहिती:

  1. जि. प. केंद्रशाळा तळेगाव – 27210915101

    • मुख्याध्यापक: धनाजी देशमुख — 📞 8275666444

  2. जि. प. शाळा शिरसोनवाडी – 27210915102

    • मुख्याध्यापक: रवि जयभाये — 📞 7588726175

  3. जि. प. शाळा खरशेत – 27210915401

    • मुख्याध्यापक: श्रीकांत फालके — 📞 7588730472

  4. जि. प. शाळा उमरोली – 272109154402

    • मुख्याध्यापक: महेंद्र सुपेकर — 📞 9209531063

  5. जि. प. शाळा भट्टीचीवाडी – 27100915602

    • मुख्याध्यापक: लक्ष्मण बराटे — 📞 9420848410

  6. जि. प. शाळा कुंडाचीवाडी – 27210915601

    • मुख्याध्यापक: नवसू वाख — 📞 9209528818

या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. शिक्षक, पालक आणि ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून शिक्षणाची गुणवत्ता सातत्याने उंचावण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

अंगणवाडी केंद्रे

ग्रामपंचायत क्षेत्रात एकूण — अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांद्वारे लहान मुलांचे संगोपन, पोषण, आरोग्य तपासणी, तसेच गर्भवती व स्तनदा महिलांसाठी आरोग्य व आहारविषयक मार्गदर्शन केले जाते. प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये स्वच्छ परिसर, बालमैत्रीपूर्ण वातावरण, खेळणी, शैक्षणिक साहित्य आणि पोषण आहाराची व्यवस्था केली आहे.

ग्रामपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांची यादी खालीलप्रमाणे आहे —

एकूण अंगणवाडी केंद्रे:

  1. अंगणवाडी केंद्र तळेगाव – 1

  2. अंगणवाडी केंद्र तळेगाव – 2

  3. अंगणवाडी केंद्र शिरसोनवाडी

  4. अंगणवाडी केंद्र खरशेत

  5. अंगणवाडी केंद्र उमरोली

  6. अंगणवाडी केंद्र भट्टीचीवाडी

  7. अंगणवाडी केंद्र कुंडाचीवाडी

ही सर्व अंगणवाडी केंद्रे महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून, बालकांच्या सर्वांगीण विकासास हातभार लावत आहेत. तसेच ग्रामपंचायतीकडून अंगणवाडींच्या इमारती, पाणी, शौचालय, आणि देखभाल सेवांसाठी आवश्यक सहकार्य दिले जाते.

योजना व प्रमुख कार्ये

कामगिरी व विकास उपक्रम

मुरबाड पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे

दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे

मुरबाड पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे.

03

सशक्त व्यवस्थापन

सर्व ग्रामपंचायतींचे संपूर्ण डिजिटायझेशन

आरोग्य व शिक्षण

ग्रामीण भागात शिक्षण व आरोग्य सुविधा सुधारणा

रोजगार

महिला उद्योजकता व युवक कौशल्य विकास

मुरबाड पंचायत समिती अंतर्गत प्रत्येक गाव स्वच्छ, डिजिटल आणि शाश्वत विकासाचे आदर्श उदाहरण बनविण्याचा आपला संकल्प आहे.

मुरबाड पंचायत समिती